सावित्रीबाई फुले म्हटल कि आपणास महात्मा ज्योतिबा फुलेयांच्या पत्नी आणि ज्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यात मोलाची साथ दिली एवढ तर नक्की आठवत आणि आठवतो एक मराठीतील म्हण “ प्रत्येक कर्तुत्वान पुरुषांच्या पाठीमागे एक स्त्री असते” हे वाक्य वापरल कि काम संपल . त्या स्त्रीची ओळख तेवढ्या पुरती मर्यादित राहते. हे भयानक वास्तव आहे यातून कोणताही महान पुरुष आणि स्त्री सुटलेली नाहीत. आज क्रांतीमशाल, ज्ञानसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. क्रांतीमशाल, ज्ञानसूर्य हि बिरुदे ऐकल्यावर काहीतरी चुकल्यांसारख वाटत असेल क्रांतीज्योती का नाही. वास्तविक सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या भारतीय शिक्षिका, पहिल्या आधुनिक कवी, पहिल्या स्त्री-निबंधकार,पहिल्या शिक्षण तज्ञ आहेत. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेतही सावित्रीबाईह्या कृतिशील तत्वज्ञ धर्मसुधारक होत्या त्यावेळी कोणतीही स्त्रीवादाची लाट भारतात आलेली नव्हती तरीही ज्योतिबा सारख्या ज्ञानसूर्या समोरही त्यांच्या बुद्धिमतेचे तेज तिळमात्र कमी होत नाही. वास्तविक त्यांचे लिखाण काव्य खूप Radical होती असे माझे स्वत:चे मत आहे. त्यामुळे...